मुरगूड मॅरेथॉन स्पर्धेत रोहित पाटील आणि एकता चव्हाण प्रथम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड जागतिक महिला दिनानिमित्त मुरगूड नगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माजी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुष गटात रोहित पाटील तर महिला गटात एकता चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांच्या हस्ते झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू. स्वाती शिंदे, नंदिनी साळोखे, अमृता पुजारी, अपेक्षा पाटील, प्रियांका येरुडकर तसेच मुरगुड नगर परिषदेचे महिला अधिकारी व सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेवक एस. व्ही. चौगले, मारुती कांबळे, लेखापाल मनाली शिंदे, लेखापरीक्षक अंजली हजारे, अधीक्षक स्नेहल नरके, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सुरेखा वडार, नगर अभियंता प्रदीप देसाई, पाणीपुरवठा अभियंता रोहित अतवाडकर, कर निरीक्षक उत्तम निकम, सहायक कर निरीक्षक तृप्ती पाटील, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, कॉ. बबन बारदेसकर, भिकाजी कांबळे, विपुल अपराध, पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, बचत गट महिला व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी सुनील पाटील यांनी केले. रेश्मा चौगले यांनी आभार मानले.
स्पर्धेचा अंतिम निकाल-
पुरुष खुला गट-
रोहित रावसो पाटील (प्रथम), शुभम सुनील मोरबाळे (द्वितीय), राहुल राजेंद्र महाजन (तृतीय क्रमांक), समरजीत अमर माने व समर्थ रंगराव कांबळे (उत्तेजनार्थ)
महिला गट :
एकता संजय चव्हाण (प्रथम), गायत्री नारायण चौगुले (द्वितीय), मनीषा विजयकुमार पाटील (तृतीय), आरती रमेश लोकरे व श्रुती संदीप मोरे (उत्तेजनार्थ).