अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुरगुड शहर पत्रकार फौंडेशनच्या पत्रकार भवन उभारणीचा शुभारंभ.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुरगुड ता.कागल येथील मुरगुड शहर पत्रकार फौंडेशनच्या वतीने साकारत असलेल्या पत्रकार भवन इमारतीच्या उभारणीचा शुभारंभ जेष्ठ पत्रकार, मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य प्रा. शाम पाटील व शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगुड चे सेवानिवृत्त प्राचार्य महादेव कानकेकर यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार फौंडेशनचे अध्यक्ष अनिल पाटील होते.
स्वागत फौंडेशनचे उपाध्यक्ष अविनाश चौगले यांनी तर प्रास्ताविक संदिप सुर्यवंशी यांनी केले.यावेळी माजी प्राचार्य महादेव कानकेकर म्हणाले,मुरगुड सारख्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या राजकीय विद्यापिठात पत्रकार भवन उभे राहावे ही अनेक वर्षांपासून मागणी होती ती आज पुर्णत्वास येत असल्याचा आनंद होत आहे.प्रा.शाम पाटील म्हणाले मुरगुड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकार भवनासाठी बसस्थानक परीसरात मध्यवर्ती ठिकाणी योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे काम नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांनी केल्याबद्दल पत्रकार फौंडेशनच्या वतीने त्यांचे आभार मानतो.पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देऊन आम्हाला चांगलेच सहकार्य केले आहे.यावेळी अध्यक्ष अनिल पाटील यांनी हे पत्रकार भवन अल्पावधीतच उभारले जाणार असुन त्यांचा उद्घाटन शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, खजिनदार राजू चव्हाण, समीर कटके, शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य प्रा. रवींद्र शिंदे, सुनील डेळेकर, दिलीप निकम, जे.के.कुंभार, प्रवीण सूर्यवंशी, ओंकार पोतदार, विजय मोरबाळे, दिलीप सुतार आदी उपस्थित होते. आभार खजिनदार राजु चव्हाण यांनी मानले.