25 हजाराची लाच घेऊन पळून जाणाऱ्या ‘तलाठी’ ला ACB ने पाठलाग करून रंगेहात पकडले

कोल्हापुर :- रोहन भिऊंगडे
वीटभट्टी साठी माती उत्खनन करण्याकरता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी 25 हजाराची लाच स्वीकारताना इंगळी (ता.हातकलंगले ) येथील तलाठी याला पाठलाग करून एसीबीने रंगेहात पकडले.
ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इचलकरंजी येथे आज केली. संतोष सुभाष उपाध्ये (रा. कुरुंदवाड ) असे अटक केलेल्या तलाठी याचे नाव आहे.
वीटभट्टी उत्खनन करणेकरिता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी तलाठी संतोष उपाध्ये यांनी तक्रारदारांकडे 30 हजार रुपयांची मागणी केली परंतु तडजोडीत ही रक्कम 25 हजार ठरवण्यात आली याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला दिली.
या माहितीनुसार लाचलुचपत विभागाने सापळारचला ही रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना तलाठी उपाध्ये याला पोलिसांची चाहूल लागताच पळू लागला अखेर त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहायक फौजदार बबंरगेकर, पोलीस नाईक सुनिल घोसाळकर, कृष्णात पाटील, कॉन्स्टेबल रूपेश माने यांनी सहभाग घेतला.