मोठी बातमी : महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टात होणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची पुढील सुनावणी दिवाळीनंतर 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर अखेर ही सुनावणी होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थेट पुढील वर्षीच होण्याची शक्यता आहे.
मुंबई ,पुण्यासह राज्यातील एकूण 11 महपालिकांची मुदत 15 मार्च 2022 रोजी संपली आहे. तसेच पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. राज्यातील 25 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. तसेच दोन डझनहून अधिक जिल्हापरिषदांचा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून सुरु आहे.
ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. यामुळे या निवडणुका रखडल्या आहेत. लवकरात लवकर सुनावणी होऊन या निवडणुका जाहीर कराव्यात, अशी इच्छुक उमेदवारांची मागणी आहे. मात्र, आता याप्रकरणाची सुनावणी दिवाळीनंतर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
या प्रकरणावर 20 सप्टेंबर रोजीच सुनावणी होणाीर होती. पण त्यावेळी ही सुनावणी होऊ शकली नाही.आता तर थेट या प्रकरणावर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, राज्यात रखडलेल्या निवडणुकांचे खापर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर फोडत आहेत.