को.जि. मा.शि. चे संचालक प्रा.एच.आर.पाटील यांच्यावतीने रणजितदादा जम्बो कोविड सेंटर साठी ११,००० रुपयांचा धनादेश.

मुदाळ प्रतिनिधी :
मुदाळ, ता.भुदरगड येथे मा .आमदार व बिद्री सहकारी कारखान्याचे चेअरमन के.पी.पाटील यांच्या संकल्पनेतून गोकुळचे नूतन संचालक मा.रणजित दादा पाटील यांनी उभारलेल्या “रणजितदादा जम्बो कोविड सेंटर” येथे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेचे मा.चेअरमन व विद्यमान संचालक तसेच भुदरगड तालुका संघाचे संचालक प्रा.हिंदुराव पाटील यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत ११,००० रुपयांचा मदत निधी देण्यात आला.
आपणही या समाजाचे काही देणे लागत असतो या जबाबदारीतून प्रा.एच.आर.पाटील यांनी कोविडच्या महामारीच्या लढाईमध्ये गरीब-गरजूंना अन्नधान्य वाटप,इम्युनिटी बूस्टर चे वाटप,मास्क व सॅनिटायझर चे वाटप, केलेले आहे. प्रा. हिंदुराव पाटील हे नेहमीच समाजोपयोगी कामांमध्ये अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी यावेळी काढले.
याप्रसंगी श्री.अजित बुडके एम.के.पाटील(सर),ग्रा.पं. सदस्य दिपक लोकरे,सुनील शिंदे,युवराज चव्हाण (फौजी),दत्तात्रय पाटील,रोहित शिंदे,सुभाष शिंदे,गणेश लोकरे,अजिंक्य पाटील,हृषीकेश पाटील,सुशांत लोकरे,अजित पाटील,प्रथमेश चव्हाण,परशराम पाटील,दिपक पाटील आदींसह प्रा.एच.आर.पाटील फौंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.