कोल्हापूर : एस.टी.च्या उत्पन्नात दिवसाकाठी ४० लाख रूपये वाढले

कोल्हापूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील संपावर गेलेले कर्मचारी आता कामावर रुजू होवू लागले आहेत. कोल्हापूर विभागाच्या उत्पन्नात सुमारे दिवसाकाठी चाळीस लाख रु. वाढ झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांनी दिली .
गेले सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ कमी होती.
न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे एसटी कर्मचारी आता कामावर परतू लागलेत. दोन दिवसात १ हजार कर्मचारी कामावर परतलेत. त्यामुळे ४२५ बसेस मार्गावर धावत आहेत. जिल्हा अंतर्गत बसेसची संख्या वाढल्याने कोल्हापूर विभागाला ४० लाखाहून अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांनी दिली. मुंबई, पुणे, बीड, नाशिक, जालना, चिपळून या लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे.
कालच्या तलुनेत आज ७५ बसेसची वाढ करण्यात आली असून एकूण ४२५ बसेस मार्गावर धावत आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशां अभावी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असलेले छोटे-मोठे व्यवसायिक आर्थिक अडचणीत आले होते. संपामुळे हे व्यावसायिक प्रवाशांच्या प्रतिक्षेत होते. संप मिटल्यामुळे आता प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने परिसरातील व्यवसायिकांतून समाधान व्यक्त होत आहे.