ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
KDCC BANK : काँग्रेसला संधी की पुन्हा पदरी निराशाच?

NIKAL WEB TEAM :
राज्यात दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आहे. हीच महाविकास आघाडी कायम राहिल्यास काँग्रेसची राष्ट्रवादीला साथ मिळेल. राष्ट्रवादीचे आठ आणि काँग्रेसचे पाच मिळून संचालकांची संख्या १३ वर जाते. यात अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद वाटून घेतल्यास यावर तोडगा शक्य आहे. गेल्या निवडणुकीनंतरही अध्यक्षपदाचा असाच फार्म्युला ठरला होता. त्यावेळी पहिली अडीच वर्षे मुश्रीफ तर नंतर पी. एन. यांना अध्यक्ष करण्याचे ठरले होते. पण, तसे झाले नाही. आता हाच फॉर्म्युलाचा दबाव टाकून काँग्रेस पहिल्यांदाच अध्यक्ष पदावर दावा करू शकते. तसे झाल्यास पी. एन. पाटील यांनाही अध्यक्षपदाची संधी आहे.
