ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता नागपूर ते गोवा 12 जिल्ह्यांमधील देवस्थाने जोडणारा मार्ग प्रवास फक्त 11 तासात ; शासनाची मंजुरी

कोणत्याही राज्याच्या, राष्ट्राच्या विकासात तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विशेष महत्त्वाची भूमिका निभावते यात शंकाच नाही. यामुळे राज्यासह संपूर्ण देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात वेगवेगळे महामार्ग तयार केले जात आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना हा मार्ग कनेक्ट करत आहे. या मार्गाची एकूण लांबी 701 km एवढी असून आत्तापर्यंत जवळपास 600 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाला आहे.

उर्वरित 101 किलोमीटर लांबीचे काम देखील जलद गतीने सुरू आहे. याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नवीन शक्तीपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. हा शक्ती पीठ महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान विकसित होणार आहे.

हा ८०२ किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार असून याच्या फायनल अलाइनमेंटला अर्थातच अंतिम आखणीला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या महामार्गासाठीच्या भूसंपादनाचे काम सुरू होईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात या प्रकल्पाचे बांधकाम सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे.

12 जिल्ह्यांमधील देवस्थाने जोडणारा मार्ग…

शक्तीपीठ महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना परस्परांना कनेक्ट करणार आहे. शिवाय इतरही अन्य महत्त्वाची देवस्थाने या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. परिणामी देवदर्शन सोपे होणार आहे. एम एस आर डी सी अर्थातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.

हा 802 किलोमीटर लांबीचा मार्ग राज्यातील 11 जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील 19 देवस्थानांना जोडणार आहे. यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास तर सोयीचा होणारच आहे शिवाय धार्मिक, कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्राला या महामार्गामुळे उभारी मिळण्याची आशा आहे.

वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील केळझरचा गणपती, कळंब येथील गणपती मंदिर आणि सेवाग्राम येथून जाणार आहे.

वाशिम येथील पोहरादेवी आणि नांदेड येथील माहूरगड शक्तीपीठ, सचखंड गुरुद्वारा येथून जाणार आहे. हिंगोली येथील औंढा नागनाथ, बीड येथील परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई शक्तीपीठ, धाराशिव येथील तुळजापूर भवानी मातेचे मंदिर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना हा मार्ग कनेक्ट करणार आहे.

शिवाय सांगली जिल्ह्यातील औदुंबरचे दत्त मंदिर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी, ज्योतिबा देवस्थान, अंबाबाई मंदिर, संत बाळूमामा समाधीस्थळ आदमापूर हे तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत. एवढेच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी हे तीर्थक्षेत्र देखील हा महामार्ग जोडणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

नागपूर ते गोवा प्रवास होणार जलद…

शक्तीपीठ मार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास जलद होणार आहे. नागपूर ते गोवा असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 20 तासांहुन अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. मात्र जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल आणि यावर वाहतूक सुरू होईल तेव्हा प्रवाशांना नागपूर ते गोवा हा प्रवास फक्त आणि फक्त 10 तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. अर्थातच प्रवाशांचा निम्म्याहून अधिकचा वेळ वाचणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासासाठी हा महामार्ग मोलाची भूमिका आणि भाऊ शकतो अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks