ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड : बैलगाडा शर्यतीचा बादशहा “गुलब्या”ला भावपूर्ण निरोप

नागणवाडी प्रतिनिधी : मष्णू पाटील

शेतकऱ्यांचा खरा साथीदार हा बैल असतो आणि तोच जेव्हा शेतकऱ्याला सोडून जातो तेव्हा शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. चंदगड तालुक्यातील वरपे परीवाराणे आपल्या जिवाभावाच्या सोबतीला आज अखेरचा निरोप दिला. बैलगाडा शर्यतीत रुबाबदार असणारा”गुलब्या”ला भावपूर्ण निरोप दिला.
चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी येथील वरपे परिवारात गुलब्या नावाचा पट्ट्या दाखल झाला होता.त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला .वेगाचा बादशहा असणाऱ्या “गुलब्या”ने महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक शर्यती जिंकल्या. आपला व मालकाचा नावलौकिक कमावला .काल त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरारीतील अनेक शर्यतप्रेमींवर शोककळा पसरली होती.डुक्करवाडी गावात ट्रॅक्टर मध्ये बसवून फुला हारांनी सजवण्यात आले होते व त्याला अखेरचा निरोप दिला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks