कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय

मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले. ते श्री विठ्ठल मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोल्हापूर शहरातील १२, मलकापूर येथील ३, हुपरी येथील ३, तळंदगे येथील १ या मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाली आहे.
वस्त्रसंहिता लागू करणारी कोल्हापूर जिल्हातील मंदिरे
कोल्हापूर शहर – श्री एकमुखी दत्त मंदिर, श्री विठ्ठल मंदिर आणि आनंद स्वामी मठ, श्री रावणेश्वर महादेव मंदिर, श्री वीरशैव ककैय्या समाज शिवमंदिर, श्री काळभैरव मंदिर, श्री भाविक विठोबा मंदिर, श्री पंत बाळेकुंद्री दत्त मठ, श्री विठ्ठल मंदिर, श्री ओंकारेश्वर मंदिर, श्री पंचमुखी गणेश मंदिर, श्रीखोल खंडोबा मंदिर, श्री शनैश्वर महादेव मंदिर
मलकापूर – श्रीराम मंदिर, श्री नरसिंह मंदिर, श्री जुगाईदेवी मंदिर
हुपरी – श्री अंबाबाई मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री जोतिबा मंदिर, श्री जोतिबा मंदिर
तळंदगे – श्री जगन्नाथ मंदिर