गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

# सावधान : कोल्हापूरात हनीट्रॅपमध्ये अडकवून तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवले ; १७ वर्षीय अल्पवयीन युवतीसह सहा जणांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी :

हनीट्रॅपमध्ये ( honey trap ) अडकवून तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.२१) रविवारी कोल्हापुरात उघडकीला आला आहे. दरम्यान हा तरुण कापड व्यापारी आहे. युवतीसह टोळीच्या दहशतीला घाबरून तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने व्यापाराने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.मात्र नातेवाईक आणि पोलीसांच्या सर्तकेतेेमुळे तरूणाचा जीव वाचला आहे.

हनी ट्रॅप ( honey trap ) टोळीचा म्होरक्या सागर माने हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून फसवणूकीचे प्रकार झाले असल्यास संबंधितांनी थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषनचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केलेे आहे

शहरातील मध्यवर्ती परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीसह सहा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले आहे. या सहा जणांना जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हवाली केले आहे.याप्रकरणी राजवाडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन तरुणीसह साखळीतील संशयित विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कोल्हापूर येथील हनी ट्रॅपचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई-पुणे पाठोपाठ कोल्हापुरातही हनीट्रॅपचा सलग दुसरा प्रकार उघडकीला आल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. संबंधित युवतीसह तिच्या साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांच्या हवाली केले आहे. फिर्यादी असलेल्या तरुणाची अल्पवयीन युवतीबरोबर काही काळापूर्वी ओळख झाली. त्यानंतर संबंधित युवतीने तरुणाशी मैत्री वाढवले त्यानंतर युवतीने तरुणाला भेटण्यास बोलवले असता तो तेथे गेला.

त्यानंतर अल्‍पवयीन मुलीच्‍या साथीदाराने तरुणाला गाठले. रोख रक्कम व सोने असा अडीच लाखाचा ऐवज तरुणांकडून घेण्यात आला. या घटनेनंतरही पैशाची मागणी होऊ लागल्याने संबंधिताने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्याशी संपर्क साधून कैफियत मांडली. पथकाने सापळा रचून युवतीसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हनी ट्रॅप प्रकरणी बेड्या ठोकलेल्या आरोपींमध्ये सागर पांडुरंग माने (वय 32) राहणार कळंबा, सोहेल उर्फ अरबाज मुनाफ वाटंगी राहणार जुना वाशी नाका, उमेश श्रीमंत साळुंखे राजारामपुरी आकाश मारुती पाटील राहणार यादवनगर लुकमान शकील सोलापूर राहणार जवाहरनगर सौरभ गणेश चांदणे राहणार माडा कॉलनी यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks