कागल तालुक्यातील निढोरी येथे ‘श्वास अभियानांतर्गत’ 1200 झाडांचे वृक्षारोपण

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील ग्रामपंचायत निढोरी व इलेव्हन फायटर ग्रुप निढोरी तसेच गावातील ग्रामस्थ यांच्यावतीने ‘श्वास अभियान अंतर्गत’ 1200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कागल रोड ते वेदगंगा नदी दोन्ही बाजुने ही झाडे लावण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिद्री मा. चेअरमन सुनिलराज सूर्यवंशी यांनी उद्घाटन केले.यावेळी सरपंच योगेश सुतार, उपसरपंच संपत मगदूम तसेच ग्रामपंचायत सदस्य रणजीतसिंह सूर्यवंशी ,सतीश चितळे ,सुधीर सुतार, प्रवीण गुरव ,एकनाथ कळमकर हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सर्व इलेव्हन फायटर सदस्य संग्रामसिंह सूर्यवंशी, बाजीराव मगदूम ,बाबासो बुगडे, संपत ढेरे ,शिवाजी कोळी, उत्तम पवार ,भैरवनाथ रानडे ,शंकर पवार ,शंकर कळमकर ,पांडुरंग मगदूम, सागर चौगुले, एम .डी .कळमकर, विक्रम कांबळे ,अमोल पाटील, पवन भारमल, एकनाथ कांबळे, निवास रजपूत, बाळासाहेब कळमकर ,सातापा पसारे ,एम. वाय. पाटील, अंकुश लोहार ,संदीप भाकरे ,विकास भाकरे ,अनिकेत चौगुले ,अरुण पवार ,गणेश काटकी, विजय कांबळे, शिवाजी ढेरे ,शिवाजी सुतार ,ज्ञानदेव कळमकर ,गजानन पाटील ,सागर चितळे, मधुकर सुतार ,उत्तम चौगुले आनंदा रानडे ,समीर कळमकर प्रतीक गुरव गब्बर कामकर ,अजित सुतार ,एम. बी. पाटील ,अशोक सुतार ,पी.के. कोळी ,सतीश मगदूम ,बाबू नारे, सातापा सुतार ,सुखदेव लोहार ,विशाल पाटील,युवराज भाकरे, आनंदा भारमल, सुनील रानडे, संजय कांबळे, आर के पवार ,डॉ.प्रदीप कांबळे यांच्या हस्ते वृक्षरोप लागवड करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांना सुनीलराव सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम पवार केले.प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले. तर आभार एस डी. मगदूम यांनी मानले.