ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यातील आरोग्य केंद्रासाठी निधीची तत्काळ तरतूद करा : समरजीतसिंह घाटगे ; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्याशी प्रस्तावित निधीबाबत केली चर्चा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित क-सांगाव, कापशी, कागल,मुरगूड,उत्तुर (ता.आजरा) आदी गावातील आरोग्य केंद्रासाठी निधीची तत्काळ तरतूद करा अशी मागणी भाजपाचे जिल्ह्याचे नेते राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली.

यावेळी राजे समोरजीतसिंह घाटगे यांनी आरोग्याच्या दृष्टीने असलेले तालुक्यातील प्रस्तावित या आरोग्य केंद्रांचे महत्त्व डॉ.भारती पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. क-सांगाव प्राथ.आरोग्य केंद्रासाठी 2 कोटी 52 लाख , कापशी प्राथ.आरोग्य केंद्रासाठी 7 कोटी 13 लाख , कागल आरोग्य केंद्रासाठी 2 कोटी 90 लाख , मुरगुड आरोग्य केंद्रासाठी 5 कोटी 89 लाख तसेच उत्तूर आरोग्य केंद्रासाठी 35 लाख रु.च्या निधीच्या मागणीचे प्रस्ताव दिले असल्याचे सांगून सदर निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची फेर विनंती यावेळी श्री.घाटगे यांनी केली.

आरोग्य सेवेसाठी निधी कमी पडणार नाही…..

डॉ.भारती पवार म्हणाल्या,जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील आरोग्यसेवा प्रभावीपणे राबवीत आहोत .त्यामुळे कागल तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रस्तावित गावांसाठी निधी कमी पडू देणार नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks