सोनाळी येथील वरद पाटील या 7 वर्षीय बालकांची गळा दाबून हत्या संशयित आरोपीस अटक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रविंद्र पाटील या 7 वर्षीय बालकांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.वरद हा मंगळवारी सावर्डे येथील आजोळी वास्तुशांती निमित्त गेला होता.मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास वरद हा बराच वेळ दिसला नाही.त्यामुळे नातेवाईकांनी आजूबाजूला परिसरात शोधाशोध केली पण वरद मिळून न आल्याने त्यांचे वडील रविंद्र गणपती पाटील यांनी या बाबतची फिर्याद बुधवारी मुरगूड पोलिसांत दिली.
याबाबत पोलिसांनी परिसरात व गावच्या तलावात शोध घेतला पण काहीच धागेदोरे न मिळाल्याने गोपनीय माहिती च्या आधारे संशयित आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने वरदचे अपहरण करून हत्या केल्याचं कबूल केले.त्यानुसार पोलिसांनी आरोपीस घटनास्थळी आणले पण वरदची हत्या रात्री च्या वेळी केल्याने आरोपीस नेमक्या कोणत्या ठिकाणी हत्या करुन मारुन टाकले हे सांगणे कठीण होत होते.पण परिसरात पोलिसांनी शोधाशोध केली असता वरद चा मृतदेह आढळून आला.वरद च्या हत्येची बातमी समजताच सावर्डे व सोनाळी परिसरातील महिलांनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.आरोपीस 12 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी 2 तास मृत्यूदेह रोखून धरत पोलिसांना धारेवर धरले.यावेळी आर.आर.पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी मृत्यूदेहास वाट मोकळी करून देत शवविच्छेदन करण्यासाठी कोल्हापूर ला पाठवण्यात आला.घटानास्थळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डिवायसपी आर.आर.पाटील यांनी भेट पहाणी केली.अधिक तपास मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास बडवे उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, कुमार ढेरे , स्वप्नील मोरे, दीपक मोरे ,मधुकर शिंदे ,प्रशांत गोजारे ,विशाल मिसाळ ,जयसिंग पाटील संदीप ढेकळे यांच्यासह अधिक तपास करत आहे