ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

कोल्हापूर : उद्धव ठाकरे, खा. पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर : एकावर गुन्हा दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या छायाचित्राखाली आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवार पेठ येथील दीपक संजय मगदूम (वय २२) याच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिसांत सोमवारी रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. शिवसेनेचे शहरप्रमुख जयवंत हारुगले यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार शिवसेना कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks