चंदगड : करंजगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्या मनमानी व ढोबळ कारभाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांचे आंदोलन

ग्रामपंचायत करंजगांव येथील सरपंच व कार्यकारीणी व ग्रामसेवक, क्लार्क यांनी मनमानीपणे ढोबळ कारभार करत जलजीवन योजनेत मनमानी कारभार, २ पेक्षा जास्त अपत्ये असुनही निवडणुक आयोगाला खोटी माहीती सादर केलेबाबत तक्रार देवुनही दोषीं सदस्या व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व कार्यकारीणी यांनी संगनमताने सत्यता लपवली आहे.
त्यांच्यावर कारवाई नाही, अवैध वृक्षतोड, सरपंच यांचेकडुन अतिक्रमण करत शेड बांधणी, राजकीय द्वेषातुन अघोषित बहिष्कार व करनी भानामती चे प्रकार, अवैध धंदे, पाणी पुरवठा नियमित करणे, अंतर्गत रस्ते, गटर्स, स्ट्रेट लाईट अपुरी सुविधा आदी बाबत वारंवार तक्रारी देवुनही कोणत्याच प्रकारची कारवाई केली गेली नाही.
ग्रा.पं. करंजगांव संरपंच, ग्रामसेवक, कार्यकारीणी व क्लार्क यांच्या मनमानी ढोबळ कारभाराच्या निषेधार्थ करंजगांव ग्रामस्थांच्या वतीने दोषींवर निलंबनाची कारवाई होवुन गुन्हे नोंद व्हावेत याकरीता अनिल नारायण गावडे, संजय रामु गावडे, अंकुश गोपाळ कांबळे,मारुती पुंडलिक सावंत, शंकर विठोबा गावडे यांनी दि १७ ऑक्टोबर पासुन सुरु केले आहे.याकरीता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सत्याग्रही धरणे आंदोलन करत आहेत.