मुधाळतिट्टा : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा रास्ता रोको ; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मुधाळतिट्टा प्रतिनिधी :
आपल्या विविध मागण्यांसाठी कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जिल्हाध्यक्ष अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली मुदाळ तिट्टा येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या रिक्त जागा तात्काळ भरा, दिवाळीची सुट्टी देण्यात यावी, प्रोत्साहन भत्ता मिळावा, अतिरिक्त कामे लावू नयेत यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, वेतन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,अंगणवाडी सेविकांच्या एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी मुदाळतिट्टा परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, जुलेखा मुल्लाणी, ललिता पाटील, सुजाता लोंढे, अश्विनी जाधव, पुष्पा पाटील, वंदना कांबळे, कविता कांबळे, शालन परीट, दिपाली बेलेकर यांच्यासह तीन तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.