ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरोली दुमाला येथे शेतकऱ्यांना औषधे व फवारणी पंपाचे वाटप.

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील.शिरोली दुमाला   येथील शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सबसिडी माध्यमातून शेतकऱ्यांना विविध औषधे व औषध फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले.

             शासनाकडून जिल्हा परिषद च्या माध्यमांमधून शेतकऱ्यांना विविध सोयी सुविधा दिल्या जातात. त्यापैकीच एक सोय शेतकऱ्यांना औषधे व औषध फवारणी पंप सबसिडी च्या माध्यमातून  30 औषध पंपाचे वाटप भाजप शेतकरी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस  दादा देसाई, यांचे हस्ते वितरण करण्यात आले. 

                    केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजना व मिळणारे शेतकरी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते . यावेळी शिव फौडेशनचे अध्यक्ष वारके  सचिन पाटील, श्रीकांत कुंभार ,शिवाजी कोईगडे, महादेव पाटील, संदीप माळी सुनील देसाई आदी  शेतकरीवर्ग  ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक  व स्वागत गुंडाअण्णा खोंद्रे व आभार विशाल देसाई यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks