ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बटकणगले येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर संपन्न.

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
बटकणगले येथील महात्मा फुले हायस्कुल मध्ये व्यवसाय प्रशिक्षण शिबिर पार पडले अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍडवोकेट हेमंत कोलेकर व कॅप जेमिनी पुणे चे सरव्यवस्थापक एन. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांनी आपल्या जीवनात आलेल्या अडचणींवर कशी मात केली हे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच नवोदय साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार झाला. मुख्याध्यापक विजय गुरबे यांनी स्वागत केले. सुपरवायझर के आर माने, स्मिता जंगम, संजय कूटरे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते आभार टि. बी. कांबळे यांनी मानले.