निढोरी येथे २३ मे रोजी ‘उपरा’ कार लक्ष्मण माने यांचे व्याख्यान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील निढोरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी दिनांक २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व व्याख्याते, उपराकार, पद्मश्री, माजी आमदार लक्ष्मण माने यांचे जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील यांनी दिली.
लक्ष्मण बापू माने हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक आहेत. ‘उपरा’ या त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृतीमुळे त्यांना ‘उपराकार’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे ‘उपरा’ हे आत्मचरित्र हे हिंदीत ‘पराया’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना आवाज म्हणून काम करतात. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळत आहे. प्रत्येकवर्षी अशी
व्याख्याने तसेच ग्रंथचळवळ उभी आयोजित करून सामाजिक प्रबोधनकरण्याचा मानस असल्याचे देवानंद पाटील यांनी सांगितले.
अॅटवन्स् कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंच, पंचशील तरूण मंडळ, इंडियन बॉईज, मित्र परिवार व सर्व ग्रामस्थ निडोरी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.व्याख्यानाचा विषय वर्तमानात महापुरूष समजून घेताना हा विषय ठेवण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुखदेव बळवंत सागर आहेत. यावेळी विविध मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे स्थळ विद्या मंदिर पटांगण निढोरी, येथे असून प्रबोधन चळवळीत काम करणारे सर्व कार्यकर्ते व बंधु भगिनींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन देवानंद पाटील यांनी केले आहे.