ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी ! MHT CET Exam 2022 पुढे ढकलली!

टीम ऑनलाईन :

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आहे ट्विट करून दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये JEE ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यात नीट परीक्षेचं वेळापत्रकही याच परीक्षेच्या काळात होतं. म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

MHT CET 2022 च्या वेळापत्रकातील बदलाबाबत अफवा आणि अटकळ पसरत असताना, उदय सामंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter वर MHT CET 2022 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये झालेल्या बदलाबद्दलचा निर्णय जाहीर केला. “जेईई आणि एनईईटी परीक्षांमुळे सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.” असं ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून जहरो विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

JEE च्या तारखांमध्येही बदल

NTA ने परीक्षेच्या सत्र 1 आणि सत्र 2 या दोन्हीसाठी JEE मुख्य 2022 परीक्षेच्या तारखांमध्ये सुधारणा केली होती. अद्ययावत वेळापत्रकानुसार, जेईई मेन 2022 सत्र 1 आता जूनमध्ये 20 ते 29 जून 2022 दरम्यान होणार आहे. दुसरीकडे, सत्र 2 च्या तारखा जुलैमध्ये म्हणजेच 21 ते 30 जुलै 2022 या कालावधीत असतील.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks