दहावी-बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

टीम ऑनलाईन :
महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढत असल्याने दहावी-बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यासाठी काही ठराविक अटी घालण्यात आल्या आहेत.
संबंधित विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहात असलेला भाग सील केला असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी आता दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार नाही. त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.
आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल.
शिक्षण मंडळाने यंदा परीक्षेत केलेले बदल
काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा प्रॅक्टिकल परीक्षांऐवजी विद्यार्थ्यांना असाईनमेंट पूर्ण कराव्या लागतील
तर लेखी परीक्षेसाठी देखील अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला आहे.
या बदललेल्या वेळांनुसार बोर्डाने यंदा 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जारी केले आहे.