गडहिंग्लज : काँग्रेस पक्षाच्यावतीने रक्तदान शिबीर : गृहराज्यमंत्री नाम. सतेज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम

गडहिंग्लज प्रतिनिधी: सोहेल मकानदार
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशा नुसार डॉ. महात्मा फुले जयंती वं डॉ आंबेडकर जयंती निमित्ताने गडहिंग्लज येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते, त्यास उस्फुर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उदघाटन जेष्ठ नेते प्रा. किसनराव कुराडे व गोडसाखरचे उपाध्यक्ष मा. संग्रामसिहं नलवडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज आजरी यांनी केले.दिग्विजय कुराडे, फत्तेसिह नलवडे, विजय शेरवी, राजशेखर यरटे, तमाण्णा पाटील, ईश्वर देसाई, जोतिराम केसरकर, दयानंद पट्टणकोडी, महेश तुरबटमठ, रावसाहेब पाटील, उत्तम देसाई, तानाजी चौगुले, संतोष पाटील, वीरसिंग बिलावर, निखिल शिरूर, शशिकांत पाटील, ओंकार घबाडे, सचिन मुळे, अश्विन यादव, प्रमोद पालकर, ओंकार पाटील, छोटू महाडिक, सागर मांजरे, मकरंद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.