सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करावी : भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत.

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार
सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवून दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,मराठा समाजाला सरकारी नोकरीत आणि शिक्षणात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणून आरक्षण देणारा ” महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास ( एसइबीसी ) वर्गाकरिता ( राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे ) आरक्षण अधिनियम 2018 ” हा कायदा सुप्रिम कोर्टाच्या घटना पीठाने रद्द केला आहे.त्यामुळे मराठा समाजातील युवकांच्यात प्रचंड असंतोष आहे.त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.मराठा समाज खरोखरच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे.मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून तो लांब राहीलेला आहे.बहुतेक समाज भुमिहीन आणि अल्पभुधारक , अल्पशिक्षित आहे.ही सुप्रिम कोर्टाच्या यापूर्वीच्या ईंद्रा साहनी निवाड्यातील मार्गदर्शक सुचनांनुसार असाधारण परिस्थिती असलेने आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा ओलंडता येते हे माननीय न्यायलयाला पटवून देणे गरजेचे आहे.त्याकरिता नव्याने राज्य मागासवर्ग आयोगाची निर्मिती करणे बरोबरच माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी , तसेच कोर्टाचा निकाल पुर्वलक्षी प्रभावाने लागू नसल्याने राज्य शासनाने ९ सप्टेंबर २०२०पूर्वी शासकिय भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांना नियुक्तिपत्रे देऊन त्वरित सेवेत सामावून घ्यावे.