वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत फुलेवाडी आरोग्य केंद्र आणि शाहुपुरी पोलिस ठाणे यांना मदत करून कोडोली काखे येथील युवक अनुप आरळेकर यांने जपली सामाजिक बांधिलकी..

रोहन भिऊंगडे / कोल्हापूर
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापुर फुलेवाडी येथील आरोग्य केंद्र आणि शाहुपुरी पोलिस ठाणे यांना मदत करून कोडोली काखे येथील युवक मा.अनुप आरळेकर यांने जपली सामाजिक बांधिलकी…

कोडोली जवळ काखे गावातील राहणाऱ्या मा.अनुप आरळेकर यांचा आज वाढदिवस…पन हया कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत हया तरुणाने तो सर्व खर्च छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापुर फुलेवाडी येथील आरोग्य केंद्र आणि शाहुपुरी पोलिस ठाणे येथील
लॉकडाऊन मधे अविरत पणे कार्यरत पोलिस, डाँक्टर ,नर्स, स्टाफ तसेच पेशंट यांना बिस्किट आणि केळी नाष्टा व मास्क वाटप करून साजरा केला…
यावेळी त्याच्या सोबत वडील जयसिंग आरळेकर मित्र ऋतुराज व विनोद महापुरे उपस्थित होते, अशीच सामाजिक बांधिलकी सर्वानी जपावी हा संदेश त्याने आपल्या कार्यातुन तरुण पिढीला दिला आहे.