ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणा दाम्पत्याला मोठा धक्का ; FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

मुंबई ऑनलाईन : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानात हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेसह दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने राजद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याने आज तातडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. एफआयआर रद्द करण्याच्या विनंतीची फौजदारी रिट याचिका केल्यानंतर त्यावर हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

राणा दाम्पत्याचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी तातडीचा विषय असल्याचे सांगत सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने दुपारी सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. यावेळी याचिका फेटाळत असताना कोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात किंवा निवासस्थानाबाहेर म्हणजेच रस्त्यावर हनुमान चालिसा म्हणू, अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी आहे, असं मुंबई हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. हायकोर्टाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळल्याने राणा पती-पत्नीचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

राणा दाम्पत्य आणि ठाकरे सरकार संघर्ष; नेमकं काय आहे प्रकरण ?

राणा दाम्पत्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ खाली दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता. तसंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली बॉम्बे पोलीस कायद्याखालील कलमेही लावली. त्यानंतर पोलिसांनी राजद्रोहाचे १२४-अ हे कलमही वाढवले. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या. ‘पोलिसांची ही कारवाई पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि राजद्रोहाचे कलमही त्याच उद्देशाने लावण्यात आलं आहे. त्यामुळे हे कलम रद्द करण्याचे आणि एफआयआरही रद्द करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत’, अशी विनंती राणा दाम्पत्याने याचिकेत केली होती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks