सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात इंग्रजी वाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरगुड़ प्रतिनिधी :
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे चालू वर्षीही इंग्रजी वाचन स्पर्धा उत्साहात पार पडली. ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक प्रवृत्ती निर्माण व्हावी, यांद्वारे त्यांचा इंग्रजी भाषाकौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने विभागाचे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान हे दरवर्षी अशा स्पर्धाचे आयोजन व संयोजन करतात. याचा विद्यार्थ्याना त्यांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्व विकासासाठी व अनेक प्रकारच्या परीक्षा व स्पर्धा परीक्षा देण्यासाठी फायदा होतो. इंग्रजी वाचन स्पर्धा घेण्याअगोदर सर्व विद्यार्थ्याना `प्रत्यक्ष व व्हाट्सअपद्वारे नोटीस व जाहिरात केली जाते. त्यानंतर सहभाग नोंदणी होते. स्पर्धेसाठीचा वाचन उतारा स्पर्धेच्या दोन दिवस अगोदरच स्पर्धकांना दिला जातो. नियोजित दिवशी व वेळी स्पर्धकांच्या वाचनाचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाते. निकालाच्या पारदर्शीपणासाठी हे रेकॉर्डिग दोन इंग्रजी व एक इंग्रजी व्यतिरिक्त अन्य विषयाचे प्राध्यापक ज्यांना इंग्रजीचे ज्ञान आहे. अशा तीन तज्ज्ञ परिक्षकांकडे पाठविण्यात येते. तीन परिक्षकांच्या गुणदानाची बेरीज करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला जातो. या स्पर्धेमध्येही विद्यार्थिनींनीच बाजी मारली. बी. ए. भाग १ च्या कु. राधिका रणजित देसाई हिने प्रथम क्रमांक पटकावला बी. कॉम. भाग ३ च्या कु. वेदिका पांडूरंग मगदूम व कु. आरती महादेव मोरबाळे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. सदर स्पर्धेसाठी प्रा व्ही. ए. प्रधान, प्रा. डॉ. सौ. एम्. एस्. पाटील व प्रा. जे. एम्. कांबळे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले व प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांची प्रेरणा लाभली.