मोठी बातमी; MPSC ची 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली

टीम ऑनलाईन :
गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असताना आता पुन्हा एकदा 14 मार्च रोजी होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलून विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे.5 अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
एमपीएससीने गुरुवारी परिपत्रक काढून राज्यात कोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने आता परीक्षा घेणे योग्य नाही असे पत्र पुनर्वसन विभागाने १०⁵ मार्चला एमपीएससीला दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी एप्रिल २०२० मध्ये राज्यसेवा व इतर परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती येण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ आॅक्टोबर, १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी होणार होती. या तीन परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. पुढच्या परीक्षा कधी होणार याबाबत विचारणा सुरू होती. दरम्यान राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व नोकरभरती मार्गी लावण्यासाठी एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्लूएस) प्रवर्गातून लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमपीएससीने परीक्षांसाठी “एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना ‘इडब्ल्यूएस’ किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मराठा संघटनांनी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तो पर्यंत परीक्षा घेऊन नये अशी मागणी केली होती, पण विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली आहे होती. पण विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी होईल तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा ११ एप्रिल रोजी होईल असे आयोगाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले होते.
१४ मार्चची परीक्षा अवघ्या तीन दिवसा़ंवर आलेली असताना विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गेले आहेत. सर्व तयारी झालेली असताना पुन्हा एकदा राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली आहे. मात्र, अभियांत्रिकी सेवा व अराजपत्रित गट ब या परीक्षेबाबत अद्याप निर्णय घेतला नाही.
एमपीएससी स्टुडंट्स राईटसचे प्रतिनिधी महेश बडे म्हणाले, ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढे स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, या तारखा आता अंतिम आहेत असे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. तरीही आता पुन्हा एकदा राज्यसेवा परीक्षा स्थगित केली आहे यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून सरकार तरुणांबद्दल गंभीर असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
एमपीएससी समन्वय समितीचे महेश घर पुढे म्हणाले, राज्यसेवेची परीक्षा आधीच चार वेळा परीक्षा पुढे गेली असल्यामुळे विध्यार्थी वर्गात आधीच नाराजी होती. आत्ता पुन्हा परीक्षा पुढे गेल्याने लाखो विद्यार्थ्यांना खूप त्रास होणार आहे. शिवाय करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे.