मोठी बातमी ! रशियाचा मेजर जनरल युक्रेनमध्ये ठार ; युद्ध थांबविण्यास पुतीन तयार, पण…

Team Online :
युक्रेनविरुद्ध सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी मॉस्को चर्चा करण्यास तयार आहे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. चर्चेची दुसरी फेरी सुरु झाली आहे.
युक्रेनवर हल्ले सुरु करण्याच्या घटनेस आता आठ दिवस लोटले आहेत. या आठ दिवसांत रशियाला जबर नुकसान सहन करावे लागले असून युक्रेनच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. अशातच रशियन सैन्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. युक्रेनमध्य़े सैन्य़ाचे नेतृत्व करण्यासाठी गेलेल्या मेजर जनरलचा मृत्यू झाला आहे.
रशियाचे मेजर जनरल आंद्रेई सुखोवत्स्की यांचा युक्रेनने केलेल्या प्रत्युत्तरात मृत्यू झालाचा दावा न्यूज एजन्सी NEXTA ने केला आहे. तसेच युक्रेनने रशियन सैन्याला जोरदार नुकसान पोहोचविल्याचा दावाही करण्यात आला आहे. KyivPost नुसार युद्धाच्या आठव्या दिवशी रशियाची ३० लढाऊ विमाने, 374 ऑटो मोबाइल्स टेक्निक्स, 42 MLRS, 900 AFV, ३१ हेलिकॉप्टर, 90 आर्टिलेरियन सिस्टम, 2 कटर, 217 टैंक, 11 एंटीएयर डिफेंस, 3 यूएवी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत ९००० रशियन सैनिकांना मारल्याचा दावा देखील केला आहे.