तुंरबे येथे निवारा बसस्थानकाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्घाटन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
तुरंबे येथे अचानक निवारा बस स्थानक गायब झाला होता.बस थांबा नसलेमुळे प्रवासी वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ग्रामीण जिल्हा संघटक, तुंरबेचे राहुल कुंभार यांनी हे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत दुसऱ्या दिवसापासून तात्पुरतं बस स्थानक उभा करण्याचे काम सुरू झालं.अवघ्या चार दिवसात निवारा बस स्थानक करण्यात आले. याचे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्घाटन शुभारंभ करून आज नागरिकांसाठी उपलब्ध केला.
या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गट अध्यक्ष युवराज येडूरे म्हणाले ,तुंरबे गाव हे खूप लोकसंख्येने मोठे असल्याकारणाने या ठिकाणी जे आता सध्या उभा असणारे शेड आहे ते तात्पुरते स्वरूपात प्रशासनाने उभा जरी केला, असला तरी आमची मनसे मागणी पक्क आणि काँक्रीट मध्ये बसस्थानक जसं पहिलं होतं त्या पद्धतीचं शेड होणं गरजेचं आहे, आणि याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि लवकरात लवकर या संदर्भाचा पाठपुरावा करून देखील हे शेड आम्ही शासनाला करण्यास भाग पाडू, आंदोलनाची दखल घेऊन शासनाने हे शेड बस स्थानक उभा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी राहुल कुंभार म्हणाले की आम्ही जे आंदोलन हातामध्ये घेतो ते पूर्णत्वास नेतो हा मनसेचा अजिंठा आहे, यापुढे देखील तुरंबे गावातील कोणताही प्रश्न असो त्या ठिकाणी मनसे पक्ष उभा राहील, येणाऱ्या काळामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून, शासनाच्या योजना जनहितासाठी उपलब्ध करून देण्याचे काम यापुढे मनसे करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी उपस्थित पैलवान वैभव माने, डॉ .रंगराव कांबळे नामदेव कुंभार, प्रेमजीत कांबळे, श्याम कुंभार, दयानंद भोईटे, ज्योती भाकरे, सौरभ कांबळे, अमित कोरे, वृषभ आमते तुरंबे नागरिक, उपस्थित होते.