मोठी बातमी : २० ऑक्टोबर पासून राज्यातील महाविद्यालयं सुरु होणार

पुणे ऑनलाइन:
राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. कोरोनामुळे दीर्घकाळापासून बंद असलेली महाविद्यालये अखेर लवकरच सुरू होत आहेत.
महाविद्यालये सुरु करण्याबाबत शासनाची नियमावली..
२० ऑक्टोबर पासून राज्यातील कॉलेज सुरु होणार आहेत, मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नाही किंवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हजर राहता येणार नाही त्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी.
डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर वसतिगृहेसुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.