सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये संभाषण कौशल्य या विषयावर कार्यशाळा संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात गुणवत्ता कक्ष आणि इंग्रजी विभाग यांच्यामार्फत मॅनेजिंग इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल या विषयावर एक दिवसीय लीड कॉलेज अंतर्गत वर्कशॉप संपन्न झाला.
सदर वर्कशॉप चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेच्या समन्वयक प्रा.डॉ. सौ एम एस पाटील यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये महावीर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या प्रा. डॉ सौ कल्पना गंगातीरकर यांनी “मॅनेजिंग इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलत असताना त्यांनी संभाषणाचे विविध पैलू, त्यामध्ये येणारे अडथळे, संभाषण कौशल्य कशी सुधारावे यासाठी विविध प्रसार माध्यमांचा कसा वापर करावा याबद्दल विस्तृत विवेचन केले. त्याचबरोबर त्यांनी व्यवहारांमधील विविध उदाहरणे देऊन प्रथम योग्य श्रोता होऊन, विविध निरीक्षणे करून, वारंवार प्रॅक्टिस करून कशी एखादी व्यक्ती उत्तम इंग्रजी बोलू शकते व अस्खलित संभाषण करू शकते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रथम सत्रामध्ये दूध साखर महाविद्यालय, बिद्री चे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सी. वाय. जाधव यांनी अध्यक्ष पद भूषविले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा.डॉ. ए. डी कुंभार यांचे “मॅनेजिंग इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल ऍट वर्क प्लेस” या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. कुंभार सर यांनी कामाच्या ठिकाणी कसे संभाषण साधावे व त्याला उत्तर द्यावेत याबाबतीत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी लीड कॉलेज अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील अनेक शिक्षक व अनेक विद्यार्थी यांनी व तसेच महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
द्वितीय दसत्रामध्ये देवचंद कॉलेज अर्जुन नगर च्या इंग्रजी विषयाच्या प्रा. डॉ. दीपा मडिवाल यांनी अध्यक्षपद भूषविले. कार्यशाळेच्या शेवटी सहसमन्वयक लेफ्टनंट व्ही. ए. प्रधान यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेसाठीलीड कॉलेज स्कीमचे महाविद्यालयातील समन्वयक प्रा. डी. ए. सरदेसाई आणि इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. ए. डी. जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.