आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिले वरणगेच्या चिमुकल्याला जीवदान ,दोन वर्षांच्या आरूषवर दहा लाखांचे उपचार मोफत ; लवकरच २० लाखांची शस्त्रक्रिया व औषधोपचारही होणार विनामूल्य

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
ही गोष्ट आहे करवीर तालुक्यातील वरणगे येथील कु. आरुष अमर पाटील याची. अवघे दोन वर्षे वय असलेल्या आरुषला गेल्या सहा महिन्यांपासूनच लघवीचा त्रास होऊ लागला. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतल्या डाॅ. वेंकटेश यांच्या साई- स्पर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. दरम्यान; किडन्यांशी संबंधित विकार असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला अधिकच्या उपचारांसाठी मुंबईला नेण्यास नातेवाईकांना सांगितले.
मुंबईतील उपचारखर्चाचा आकडा ऐकून हैराण झालेल्या आई-वडील श्री. अमर व सौ. शर्वरी यांनी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची भेट घेतली आणि आपल्या दोन वर्षांच्या बाळाची व्यथा सांगितली. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी त्यांना दिलासा दिला. “कशाचीही अजिबात चिंता करू नका. तुमचे बाळ ठणठणीत बरे करूया”, असा आधारही दिला.
आमदार श्री. मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने अंधेरी – पश्चिम येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये महागडे उपचार सुरू झाले. या दवाखान्यात साधारणता तीन ते चार लाखांचे उपचार मोफत झाल्यानंतर त्यांनी आरुषला पुढील उपचारांसाठी गिरगांव येथील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यास सुचविले. अलीकडच्या चार महिन्यांमध्ये त्याच्यावर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सहा ते सात लाखांहून अधिक खर्चाचे हे उपचारही निव्वळ आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळे मोफत झाले आहेत.
आत्ता तब्येत ठणठणीत असली तरी लवकरच आरूषवर एक शस्त्रक्रिया आणि औषधोपचार करावे लागणार आहेत. या शस्त्रक्रियेचा आणि औषधोपचारांचा खर्च वीस लाखाहून अधिक आहे. तोही आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून मोफतच होणार आहेत.
आमदार मुश्रीफसाहेबांमुळेच आमच्या बाळाला जीवदान………..!
याबाबत आरुषचे वडील अमर पाटील म्हणाले, कागल विधानसभा मतदार संघाशी काहीही संबंध नसलेले आमचे कुटुंब. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मोठ्या तळमळीने आमच्या आरुषच्या उपचारासाठी पाठपुरावा केला आणि आतापर्यंत दहा लाखाहून अधिक खर्चाचे उपचार मोफत झाले. यापुढील शस्त्रक्रिया व उपचारासाठीही वीस लाखाहून अधिक खर्च अपेक्षित आहे.
सामान्य शेतकरी असलेले आमचे कुटुंब एवढ्या मोठ्या खर्चासमोर कसे टिकणार होते? असेही ते म्हणाले. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे पाठबळ, त्यांचे स्वीय सहाय्यक वजीर नायकवडी यांचे सहकार्य, कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील साई -स्पर्श हॉस्पिटलचे डाॅ. वेंकटेश तरकसबंद आणि मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलचे बाल किडनी रोगतज्ञ डाॅ. किरण साठे यांच्यामुळेच आमच्या मुलाला जीवदान मिळाल्याची, कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.