
“बिद्रीचा वडापाव लई भारी” भागात कुठ पण वडापावचा विषय निघाला की फक्त बिद्रीच नाव तोंडात येतं.

बिद्री कारखाना साईटवर जवळ जवळ 45 ते 50 वर्षा पासुन लोकं वडापाव व्यवसाय करतात. त्याच बरोबर मिरची भज्जी, कांदा भज्जी असे अस्सल पदार्थ येथे अगदी स्वादिष्ट मिळतात.
‘ वडापाव ‘ हा खाद्य पदार्थ जलद खाद्य पदार्थांच्या वर्गात येतो. कष्टकरी वर्गच नव्हे, सर्वसामान्यासह श्रीमंत वर्गातही वडापावला पसंती दिली जाते. वडापाव सोबत तळलेली हिरवी मिरची बघितली की खवय्यांची जीभ खवळण्याचे काम करतो.
आजच्या या वडापाव दिना निमित्त बिद्री येथील सागर व सारंग सुर्यवंशी यांच्या हॉटेल विजया मधून यांनी भारतीय आजी माजी सैनिक यांच्या साठी मोफत वडापाव देऊन एक वेगळा उपक्रम राबवला त्यांचे बिद्री परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.