एकाधिकारशाही कारभाराला कंटाळून भुदरगड तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा परिवर्तन आघाडीस जाहीर पाठींबा…

गारगोटी प्रतिनिधी :
सालपेवाडी (ता.भुदरगड) येथील बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक, भुदरगड तालुका संघाचे माजी संचालक व सालपेवाडी गावचे सलग 10 वर्षे सरपंच असणारे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख नेते विलास झोरे व गारगोटी (ता.भुदरगड) गावचे माजी सरपंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते सर्जेराव देसाई (तात्या) यांनी बिद्री कारखान्याच्या निवडणूकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी परिर्वतन विकास आघाडीला जाहीर पाठींबा दिला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना झोरे म्हणाले की, बिद्री कारखान्याचे खरे मालक हे कारखान्याला ऊस घालणारे शेतकरी आहे. परंतू के. पी. पाटील यांनी राजकीय स्वार्थापोटी संचालक सांगतील त्याच शेतकऱ्यांची ऊस तोड केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या या कपटी व एकाधिकारशाही कारभाराला कंटाळून तालुक्यातील अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते त्यांना सोडून जात असून हेच कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना सर्जेराव देसाई म्हणाले की, के. पी. पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कार्यकर्त्याला कधीही मोठे होऊ न देता त्याचे पाय ओढण्याचे काम केले आहे. त्यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे बिद्री कारखान्यासह सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बिद्रीत परिर्वतन होणे गरजेचे असून सर्वांना जोमाने कामाला लागावे असे ते म्हणाले.
यावेळी गारगोटीचे माजी उपसरपंच सचिनबाबा देसाई, भाजपा नेते अलखेश कांदळकर, विजयराव आबिटकर, अजित देसाई, मारुती इंदूलकर, विजय शिंदे, रघुनाथ गोरे, रघुनाथ चव्हाण, दिपक रब्बे, दशरथ रब्बे, आनंदा देसाई, सागर इंदूलकर, चेतन शिंदे, शरद देसाई, ईश्वरा करवळ, अमर इंगळे, चंद्रकांत देसाई, दिपक देसाई, दशरथ कुपटे, शामराव इंदूलकर, बजरंग देसाई, हंबीरराव देसाई, पांडूरंग आबिटकर, संजय पोवार, अमित देसाई, सागर चव्हाण, विश्वास शिंदे, संजय झोरे, उज्वल देसाई, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.