ताज्या बातम्या
बिद्री येथील गोल्डन युवा ग्रूप बिद्रीचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके
गोल्डन युवा ग्रूप बिद्री या मंडळाने यंदा अठ्ठावीसव्या वर्षांत पदार्पण केले आणि कोरोनाच्या महामारी नंतर प्रथमच मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करत असलेने मंडळाच्या कार्यकत्यात मोठा उत्साह दिसून येत होता. यावर्षी मंडळाने सालाबाद प्रमाणे महाप्रसाद , गणेश आगमन मिरवणूक तसेच विसर्जन मिरवणूक अगदी शांततेत व उत्साहात पार पाडली. यावर्षी गणेश मूर्तीचे देणगीदार श्री.संजय रामचंद्र पाटील हे होते.

यावर्षी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) यांच्या तर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यामध्ये मंडळाच्या बऱ्याच कार्यकत्यांनी रक्तदान केले त्यामध्ये महिलांचा लाक्षणीय सहभाग दिसून आला.
त्यावेळी भिमराव पवार, राजु चौगले, विलास गवाणकर, रमाकांत पाटील ,माधव कुंभार, अरुण पलंगे, राजेश बिल्ले, सूरज पाटील, सागर तामोत, विजय पाटील, सुरेश तोरस्कर, अजित घोरपडे , मयूर पाटील, तन्मय बिल्ले, अरुण पोवार, अमोल चौगले व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.