शिंदेवाडीच्या जय शिंदेची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील मुरगूड विद्यालय ज्युनि कॉलेज चा विद्यार्थी व शिंदेवाडी गावचा सुपुत्र जय निवास शिंदे याची शासकीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी चौदा वर्षे वयोगटाखाली संघात निवड झाली आहे.सातारा येथे झालेल्या निवड चाचणीतुन ही निवड करण्यात आली आहे.सोलापूर येथे दोन ते चार जानेवारी ला या स्पर्धा होणार आहेत.
कागल तालुक्यातील स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्या नंतर जिल्हास्तरीय स्पर्धेत मुरगूड विद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकावले होते.यावेळी सर्वच सामन्यात जय ने उत्कृष्ट खेळ केला होता या खेळाच्या जोरावर त्याची सातारा येथील निवड चाचणीसाठी निवड झाली होती त्या ठिकाणी ही त्याने चमकदार कामगिरी केल्याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याला शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्राचार्य जयकुमार देसाई,अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,चेअरमन मंजिरी देसाई मोरे,पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई ,कोजिमाशीचे अध्यक्ष बाळ डेळेकर,प्राचार्य एस. आर. पाटील, उपमुख्याध्यापक एस .बी. सुर्यवंशी,उपप्राचार्य एस.पी.पाटील, पर्यवेक्षक एस.डी.साठे,पी.बी.लोकरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक संभाजी कळंत्रे, अनिल पाटील,महादेव खराडे,वडील निवास शिंदे ,शिंदेवाडीचे कब्बडी पंच सुरेश खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.