बिद्री परिसरातील शाळांत म. गांधी , शास्त्रींना अभिवादन

बिद्री ता. २ ( प्रतिनिधी :अक्षय घोडके) :
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बिद्री ( ता. कागल ) परिसरातील विविध शाळांमध्ये या नेत्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त बिद्री, बोरवडे, उंदरवाडी, फराकटेवाडी, सोनाळी, वाळवे खुर्द आदी गावांतील प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बिद्री येथील भारतमाता हायस्कूल या शाळेत महात्मा गांधी व शास्त्रीजींच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एस.पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतिहास विभाग प्रमुख एम.जी. फराकटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
बोरवडे ( ता. कागल ) येथील बोरवडे विद्यालयात महात्मा गांधी व शास्त्री जयंती साजरी झाली. यावेळी मुख्याध्यापक ए. आर.वारके, ई.डी. घोरपडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. विद्या मंदीर बोरवडे या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्रशाळा बिद्री येथेही गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख तानाजी आसबे, प्रभारी मुख्याध्यापक सुकुमार पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यामंदीर उंदरवाडी शाळेतही गांधी जयंती निमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक तुकाराम जरग, अरुण चौगले, शिवाजी देवाळे यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
विद्या मंदिर सोनाळी शाळेत मुख्याध्यापक पांडूरंग फासके यांच्या हस्ते आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. याशिवाय विद्या मंदीर फराकटेवाडी, कुंभारवाडा, दत्तनगर या प्राथमिक शाळांमध्येही गांधी व शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली .