ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिद्री एफआरपी 3056 रुपये एकरक्कमी देणार अध्यक्ष के. पी. पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

बिद्री प्रतिनिधी :

येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार दि. ६ नोव्हेंबर रोजी केला जाणार असून गळीताला येणाऱ्या प्रतिटन ऊसाला एफआरपी नुसार ३०५६ रुपये दर एकरक्कमी दिला जाईल. हा दर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वाधिक आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याच्या सन 2020-21 या गतगळीत हंगामात 6 लाख 80 हजार 427 मे. टन ऊसाचे गाळप करुन 8 लाख 65 हजार 600 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 12.72 टक्के मिळाला आहे. त्यानुसार कारखान्याची एफआरपी  3055.17 रुपये इतकी होते. मात्र कारखान्याने हि रक्कम 3056 रुपये इतकी देण्याचा निर्णय घेतला आहे.  कारखान्याने कायमपणे एकरक्कमी एफआरपी दिली असून इतर कारखान्यांच्या तुलनेत नेहमीच 100 ते 150 रुपये जास्त राहिली आहे. यंदाही हि प्रथा कायम राखली जाईल.
 
ते म्हणाले, येत्या हंगामासाठी 13 हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून यामधून कारखान्यास 10 लाख मे. टन ऊसाची उपलब्धता होईल. वाढीव विस्तारीकरणामुळे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस लवकरात लवकर गाळप करण्याचा मानस असून ऊस उत्पादकांनी सर्व ऊस कारखान्यास पाठवून जिल्ह्यातील सर्वाधिक दराचा लाभ घ्यावा.
 
            यावेळी संचालक गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील व अधिकारी उपस्थित होते. स्वागत व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांनी केले. आभार कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks