बिद्री येथे कोरोनाविषयी बैठक पार.

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
सध्या कोरोनाचे वाढते प्रमाण व लसीकरणा बाबत आदी विषयावर कागल तालूक्यातील बिद्री ग्रामपंचायत मध्ये आरोग्य विभाग ग्रा.प.सदस्यां मध्ये आढावा बैठक घेण्यात आली. पं.स.सदस्य जयदिप पोवार, मंडळ आधिकारी श्री माधव व्हरकट ,बिद्री तलाठी रविंद्र मारूती पाटील, कोतवाल दिगंबर गुरव, ग्रामविकास अधिकारी बी.के.कांबळे हे या बैठकीस उपस्थीत होते.
या बैठकी मध्ये सध्या लसीचा तुटवडा जाणवत असून गावातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत घरोघरी लसीकरण करणे गरजेचे आहे
तर कांही सदस्यानी आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त करत गावामधील लोकांना लसी मध्ये प्राधान्य द्या मगच बाहेरील लोकांचा विचार करावा. आरोग्य विभागाने लसीकरणा मध्ये कोणतेही राजकारण करू नये. सर्वाना समान न्याय देने गरजेचे आहे. आदि विषयाबरोबर गावातील लोकांसाठी आरोग्य विषयी कोण कोणत्या उपाय योजना कराव्यात या विषया वर देखील चर्चा झाली.
यावेळी बोलताना ग्रामविकास आधिकारी बी.के.कांबळे म्हणाले ग्रामपंचायतीने गावातीतल लोकांच्या आरोग्या साठी घरोघरी जावून मोफत सॅनिटायझर वाटप केले असून आता पर्यंत नऊ लोकांना ग्रामपंचायत मार्फत कोरोना पासून बचाव करत घरपोच केले आहे . त्याच बरोबर कोरोना पासून होणारे मृत्यूचे प्रमाण शून्य असून यामध्ये सर्व सदस्याने चांगल्या आरोग्य विषयी वेळो वेळी घेतलेल्या चांगल्या निर्णया मुळे हे शक्य झाले आहे.अशोक पोवार, भाऊ पाटील, शहाजी गायकवाड आदिनी आपली मते व्यक्त केलीत.
या बैठकीस मंडळ अधिकारी माधव व्हरकट, बिद्री तलाठी रविंद्र मारूती पाटील, कोतवाल दिगंबर गुरव, पांडुरंग चौगले, शहाजी गायकवाड, अशोक पोवार,भाऊ पाटील, दिगंबर पाटील,आनंदा पाटील, सुशांत चौगले, राजेंद्र चौगले, सागर काबळे, साईराज पाटील,योगेश पाटील,दिंगबर पाटील,पोलिस पाटील रमेश ढवण, आरोग्य विभागाचे साताप्पा वायदंडे, नारायण पाटील यांच्यासह आशा वर्कर उपस्थीत होत्या.