बिद्रीवर ६७ व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट , दोन पॉझिटीव्ह

बिद्री प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या वतीने आज बिद्री कारखान्यावर व्यापारी आणि कामगारांची कोरोना अँटिजन टेस्ट करण्यात आली. यावेळी एकूण ६७ जणांच्या केलेल्या अँटिजन टेस्टमध्ये दोन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
शासनाने जाहीर केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करणे सक्तीचे केले आहे. यासाठी आरोग्य विभागाने बिद्री परिसरातील व्यापारी आणि दुकानदारांची मोठी संख्या विचारात घेऊन कारखाना कार्यस्थळावर आज अँटिजन टेस्टचे आयोजन केले होते. यामध्ये परिसरातील व्यापारी, कामगार, ग्राहक व फिरत्या नागरिकांची टेस्ट करण्यात आली.
मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी तीन या वेळेत ६७ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
यावेळी सुरेश कोरवी, युवराज पाटील, डॉ.एस. एम.वायदंडे ,वसंत पाटील के. ए. सनगर, माधुरी कोरवी,जे.पी . गायकवाड, आरती घोरपडे, बिद्रीचे पोलीस पाटील रमेश ढवण, तलाठी रविंद्र पाटील , कोतवाल दिगंबर गुरव, बिद्री ग्रा.प .चे सर्व सदस्य, व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

बिद्री : येथे अँटिजन टेस्टच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित मुरगुडचे स.पो.नि. विकास बडवे,सुरेश कोरवी, युवराज पाटील, डॉ. . एम.वायदंडे,पोलीस पाटील रमेश ढवण , तलाठी रविंद्र पाटील , कोतवाल दिगंबर गुरव आदी.