ताज्या बातम्या

भुदरगड प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दयानंद भोईटे यांची वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सर्व कोविड सेंटरना मदत

गारगोटी प्रतिनिधी :

भुदरगड प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दयानंद भोईटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत भुदरगड तालुक्यातील सर्व पाचही कोविड सेंटरना मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जोपासली.

मडीलगे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नव्याने उभारलेल्या कोविड सेंटरला फळे वाटप केली. यावेळी पंचायत समिती भुदरगड चे सदस्य संग्राम देसाई, सरपंच शुभांगी परीट, युवराज सुर्वे आदी उपस्थित होते. रणजितसिंह पाटील कोविड सेंटर मुदाळ व जीएसटी कोविड सेंटर गारगोटी, आणि मनवेल बारदेसकर कोविड सेंटर या तिनही सेंटरना सुध्दा फळे वाटप करण्यात आली. यावेळी गोकुळ चे संचालक रणजितसिंह पाटील, भुदरगड तालुका संघाचे चेअरमन बाळकाका देसाई, रवी वायदंडे आदी उपस्थित होते. यापूर्वीही ७५ हजार रुपयांची साहित्य वाटपाची मदत गारगोटी कोविड सेंटरला करण्यात आली होती. तसेच नव्याने उभारलेल्या पिंपळगाव कोविड सेंटरला सुद्धा फळे, औषधे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पिंपळगाव कोविड सेंटर वैद्यकीय कर्मचारी, उपसरपंच उदय मिसाळ, स्टार ग्रुप अध्यक्ष अनिल आरबुने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पंकज तोडकर, ऋतुराज भोईटे, राहुल भोईटे, प्रवीण भोईटे, विशाल भोईटे, अजित कदम, देवदत्त शिंदे, योगेश भोईटे, सचिन पाटील, अशोक गुरव, राजेंद्र दबडे आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks