भुदरगड भाजपा जिल्हा बँकेसह सर्व निवडणुका ताकतीने लढवणार; भाजपाचा जिल्हा बॅंक निवडणूक पार्श्वभुमीवर गारगोटी येथे मेळावा

गारगोटी प्रतिनिधी :
प्रत्येक निवडणुकीत भाजपाला गृहीत धरून सत्ता खेचण्यासाठी घेतले जाते मात्र सत्ता आल्यानंतर भाजप ची दखल घेतली जात नाही त्यामुळे जिल्हा बँकेसह सर्व निवडणुका ताकतीने भाजपाने लढवणार अशा प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
गारगोटी ता. भुदरगड येथे भाजपाच्या संपर्क कार्यालयात झालेल्या भाजपाच्या सेवा संस्था व इतर संस्था ठराव धारकांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मेळाव्यास भाजपाचे नेते राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, संघटनमंत्री नाथाजी पाटील ,भाजपा तालुकाध्यक्ष विनायक परुळेकर प्रमुख उपस्थित होते.
भाजपा नेते राहुल देसाई म्हणाले जिल्हा बँकेबरोबरच पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढणार असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. त्याबरोबरच जिल्हा बँकेच्या निवडणूकीत पक्ष्याची ताकत आहे तरी या संदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा करू.
भाजपाचे संघटन मंत्री नाथाजी पाटील म्हणाले, भुदरगड तालुक्यात सेवा संस्था व इतर संस्था यांचे मतदार भाजपाकडे असून भाजपाला योग्य संधी द्यावी लागेल.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत म्हणाले, चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर चर्चा करून सर्वांनुमते जिल्हा बँकेसाठी सक्षम उमेदवार देऊया.
यावेळी तालुका अध्यक्ष विनायक परूळेकर,प्रकाशराव कुलकर्णी, वसंतराव प्रभावळे,किरण कुरडे, योगेश परुळेकर, अनिल तळकर, प्रताप मेगाने ,अमर पाटील,रविंद्र कामत भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब भोई,सरपंच संदेश भोपळे यांची भाषणे झाली.
यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक धोंडीराम मगदुम ,प्रदिप पाटील ,एमडी पाटील, शिवाजी मातले गोपाल कांबळे, नारायण पाटील ,पांडुरंग डेळेकर, सदाशिव देवरृडेकर, अलकेश कांदळकर, एम एम कांबळे, शहाजी ढेरे, दगडू राऊळ, सुरेश खोत, प्रताप पाटील, सुभाष पाटील सुरेश गुरव, शुभम मगदूम, संभाजी नलगे, सुनील खंटागळे, सचिन देसाई, विलास मालवेकर दिनकराव भोईटे दतात्रय पाटील अमोल साळुखे प्रमुख उपस्थित होते स्वागत बजरंग कुरळे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष प्रकाश वास्कर यांनी मानले.