ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीय
…अखेर बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर.

बेळगाव प्रतिनिधी :
गेल्या दोन वर्षांपासून सर्वांची प्रतीक्षा लागलेली बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने बेळगावसह हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी (गुलबर्गा) या तीन महापालिकेंच्या निवडणूकीं संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 16 ऑगस्ट रोजी बेळगावचे जिल्हाधिकारी बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करतील.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सप्टेंबरला मतदान होणार आहे. सहा सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे.दोन वरच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्षाच्या हालचालीना वेग आला आहे.