साक्षी संदिप बोटे यांची महा महिला बचतगट निधी लि.बॅंकेच्या संचालक पदी निवड

बिद्री प्रतिनिधी :
महा महिला बचत गट निधी लिमिटेड बँकेच्या संचालक पदी साक्षी बोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .यावेळी बँकेच्या चेअरमन डॉ. निवेदिता येडूरे यांच्या कडून निवडपत्र देण्यात आले.
साक्षी बोटे ह्या स्वराज्य निर्माण या सामाजिक संस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र एन.जी.ओ. समितीचे संपर्क प्रमुख संदिप बोटे यांच्या पत्नी आहेत. तसेच साक्षी बोटे या स्वराज्य निर्माणच्या माध्यमातून महिलांमध्ये व्यवसायिक सक्षमीकरण करण्यासाठी अग्रेसर आहेत.
बोटे यांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांच्यावर विविध स्तरातून आनंदाचा वर्षाव होत आहे.
नूतन संचालक साक्षी बोटे यांचे बँकेच्या चेअरमन डॉ.निवेदिता येडूरे, व्हा.चेअरमन विमल पाटील, संचालिका ॲड.वैष्णवी पडवळ, सौ.शितल थवी, बँक मॅनेंजर सलोनी खुळांबे, कॅशियर स्वप्नाली सुतार यांनी अभिनंदन केले.
यावेळी बोलताना साक्षी बोटे यांनी ग्रामीण भागातील बचतगट, महिलांना बॅंकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहु, असे सांगितले.