ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भारतीय जनता पक्षाचे वतीने कोवीड रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत पोळी भाजी वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व महेश जाधव, राहूल चिकोडे ,अशोक देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत पोळी भाजी उपक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे करण्यात आली.
हा उपक्रम या आपत्कालीन स्थितीमध्ये कायम सुरू राहणार असलेचे सांगण्यात आले. सीपीआर रुग्णालय तसेच सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे विजय जाधव,भगवान काटे, हेमंत अराध्ये,सचिन तोडकर, प्रसाद मोहिते,विराज चिखलीकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.