भगवान महावीर जन्म दिनाचे औचित्य साधुन राजस्थानी जैन मारवाडी समाजातर्फे सी.पी.आर कोवीड सेंटरला 30 हजार रुपये किमतीचे साहित्य केले प्रदान

रोहन भिऊंगडे /
कोल्हापुर :-
कोल्हापुरातील सीपीआर मधल्या कोविड सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना जेवण देण्यात अडचणी येत होत्या. त्यासाठी आवश्यक विशिष्ट साहित्य नव्हतं. इथं सेवाभावी तत्त्वावर कार्य करणाऱ्या दोघा व्यक्तीनी भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाच औचित्य साधून आज कोवीड सेंटरला ३० हजार रुपये किमतीच साहित्य प्रदान करण्यात आल.
कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय. सीपीआरच्या कोवीड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे या रुग्णांवर उपचारादरम्यान त्यांना पुरेस सकस अन्न दिल जातं. मात्र यासाठी कोवीड सेंटरमध्ये ताट, वाट्या आणि अन्न वाढण्यासाठी भांडी उपलब्ध नाहीत. गेल्या वर्षभरापासून इथं सेवा तत्त्वावर काम करणाऱ्या माजी नगरसेवक ईश्वर परमार, आरोग्य सेवक बंटी सावंत आणि संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर गुजरी ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल यांनी इथं वस्तु देण्याचा निर्णय घेतला. स्वतःकडील ३० हजार रुपये खर्च करून भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाचं औचित्य साधून, तसचं श्री. राजस्थानी जैन मारवाडी समाजाच्या स्वर्गिय अमिचंद राठोड यांच्या स्मरणार्थ आज सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस एस मोरे यांच्याकड ४० बादली, ताट, पळी अस साहित्य प्रदान केलं. यावेळी राजेश राठोड, नंदू गुंदेशा, प्रशांत कोतमिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.