ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कडगाव हायस्कूल, कडगाव येथे माहिती अधिकार दिन उत्साहात संपन्न.

कडगाव प्रतिनिधी :
माहिती अधिकार कायद्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारा कायदा प्राप्त झाला आहे .या कायद्याचा योग्य वापर झाल्यास प्रशासनातील पारदर्शकता आणि महत्त्वपूर्ण माहिती लोकशाही बळकट करण्यास उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव शाळेचे ज्येष्ठ शिक्षक ए .डी. देसाई यांनी व्यक्त केले. माहिती अधिकार दिन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. आर. डी .पोवार होते .स्वागत व प्रास्ताविक अकबर भडगावकर यांनी केले. यावेळी चंद्रकांत लिमकर, चंद्रकांत मासाळ, सत्याजित चोरगे,वजीर मकांनदार, उपस्थित होते. आभार भैरवनाथ राणे यांनी मानले.