ताज्या बातम्या

महापालिकेच्या वॉर रुममधून आजअखेर 1 हजार 500 नागरीकांना बेड उपलब्ध

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे 

महापालिकेच्या वॉर रुममधून शहरातील व ग्रामीण भागातील 1 हजार 500 नागरीकांना कोव्हीड-19 साठी बेड उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये व्हेन्टीलेटर, ऑक्सीजन व नॉन ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन दिलेले आहेत. यामध्ये खाजगी रुग्णालयांसह कोरोना केअर सेंटरमधील बेड दिले आहेत.

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानने शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत तसेच बेडसाठी विविध रुग्णालयात फिरायला लागू नये यासाठी महापालिकेच्या प्रशासनाच्यावतीने दि.7 एप्रिलपासून वॉर रुमची स्थापना केलेली आहे. शहरातील नागरीकांना सरकारी व खाजगी रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती येथे 24 तास उपलब्ध होते. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृह येथे वॉर रुम आहे. 0231-2545473 व 0231-2542601 हा टोल फ्री नंबर या सेवेसाठी सुरु केला आहे. या नंबरवर संपर्क केल्यास कोणत्या रुग्णालयामध्ये कोव्हीड-19 साठी बेड उपलब्ध आहेत याबाबतची सविस्तर माहिती मिळते.

वॉररुममध्ये 24 तास माहिती देण्यासाठी तीन शिफ्टमध्ये 12 कर्मचारी काम करत आहेत. ही सुविधा कोरोना रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. एका फोनवर त्यांना शिल्लक बेडची माहिती मिळत आहे. यामुळे वेळेवर उपचार होत असल्याने कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी हा विभाग एक महत्वाची जबाबदारी पाडत आहे. कोल्हापूरसह पुणे, मुंबई, कर्नाटकवरुनही फोन येत आहेत.

वॉररुमला 2 हजार लोकांचे फोन

वॉररुममध्ये आजपर्यंत 2 हजार नागरीकांनी व्हेन्टीलेटर, ऑक्सीजन बेड व हॉस्पीटलमध्ये कोव्हीड-19 साठी बेड उपलब्धतेसाठी संपर्क साधला आहे. यापैकी सरकारी व खाजगी कोवीड रुग्णालयामध्ये तसेच कोवीड काळजी केंद्र यांच्याबद्दल बेड उपलब्धतेची माहिती दिलेली आहे. आजपर्यंत जवळपास 1 हजार 500 नागरीकांना या वॉररुमच्या माध्यमातून बेड उपलब्ध झालेले आहेत.
वॉर रुमच्या माध्यमातून ऑक्सीजन सिलेंडरचाही पुरवठा
महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या मदतीने 10 साखर कारखान्यांकडून त्यांच्याकडील 80 ऑक्सीजन सिलेंडर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अधिगृहित केली आहेत. महापालिकेच्या केएमटी वर्कशॉप येथे ती ठेवली आहेत. खाजगी अथवा सरकारी रुग्णालयांकडील ऑक्सीजनचा साठा कमी पडल्याची माहिती वॉर रुमकडे प्राप्त होते. यावेळी तातडीने या दवाखाण्यांना त्यांचा साठा येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात के.एम.टी.वर्कशॉपमधील शिल्लक असलेली ऑक्सीजनची सिलेंडर दिली जातात.

वॉर रुम टीमची अशीही सामाजिक बांधीलकी
ग्रामीण भागातील एक गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असलेने तीला शहरात कोठेही ॲडमिट करुन घेतले जात नव्हते. ती शहरातील एका हॉस्पीटलच्या दारात सकाळी 7 वाजलेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत गेटवर ॲडमिट होण्यासाठी थांबली होती. परंतू तेथेही ॲडमिट करुन घेतले नाही. त्या महिलेच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या वॉर रुमला बेड पाहिजे असल्याचे कळविले. तातडीने महापालिकेच्या टिमने त्या महिलेला खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन दिला. महिलेची प्रसुती होईपर्यंत महापालिकेचे पथक तेथून बाहेर पडले नाही. सध्या महिला कोरोनामुक्त असून तीचे नवजात बाळही सुखरुप आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks