ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड येथे मराठा समाज आरक्षण प्रश्नी राज्य सरकारचा निषेध !

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सगेसोयऱ्यासह आरक्षणात समावेश केला नाही . मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही .दहा टक्के आरक्षण देवून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे . या बद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने शिवतीर्थावर महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला .

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळायलाच हवे . सगेसोयऱ्यासह आरक्षणाचा लाभ मिळावा . या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला .

मुरगुड येथील शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेधाच्या घोषणा दिल्या . महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यभर सकल मराठा समाजाच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला .मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करून त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढे रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला .

या निषेध आंदोलनात सर्जेराव भाट , मयूर सावर्डेकर , ओंकार पोतदार , जगदीश गुरव ,सुशांत महाजन , रणजित मोरबाळे ,पृथ्वी चव्हाण ,रोहीत मोरबाळे ‘ अनिल रावण  ,विशाल मंडलिक , संकेत भोसले यांचा समावेश होता . या आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks